spot_img
spot_img

श्री अमोल जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित गांधी महाविद्यालय कडा चे विशेष हिवाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न

कडा (प्रतिनिधी) राष्ट्रीय सेवा योजना गांधी महाविद्यालय कडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजीनगर यांच्यासंयुक्त विद्यमाने मौजे देविनीमगाव येथे आज दि.27/ 01/2024. रोजी उद्घाटन संपन्न झाले प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ जवाहर भंडारी यांनी केले सुत्र संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ विष्णु गव्हाणे यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.कांतीलालजी चानोदिया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे ट्रस्ट अध्यक्ष श्री गोकुळदासजी मेहेर उपस्थित होते जगदंबा विद्यालया च्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा शेटे यावेळी पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना म्हणाल्या राष्ट्रीय सेवा योजना का व कशासाठी याचा उद्देश सांगितला व त्यांनी आपले महाविद्यालइन जीवनातील राष्ट्रीय सेवा योजना मधील सहभाग व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नंदकुमार राठी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्र उभारणीत किती मोलाचे सहकार्य करते त्यामुळे विद्यार्थ्यांचा किती विकास होतो यासाठी प्रत्येक विद्यार्थी वर्गाने या राष्ट्रीय सेवा मध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. यावेळी महाविद्यालयाचे स्वयंसेवक आपल्या गावात विविध उपक्रम हाती घेतील यावेळी प्राचार्य महोदयांनी व डॉ.मदन मार्कंडे यांनी जगदंबा विद्यालयासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये ची देणगी जाहीर केली या देनगीचा उपयोग शैक्षणिक विकासासाठी करण्याचे वचन मुख्याध्यापक महोदयांनी दिले कार्यक्रमास बबन घोंगडे यांनी मार्गदर्शन केले.शालेय समितीचे सर्व सदस्य, देवीनिमगाव च्या सरपंच श्रीमती शोभा मार्कंडे, उपसरपंच काकासाहेब ढवळे, डॉ. मदन मार्कंडे, समुदाय आरोग्य अधिकारी देवी निमगाव च्या नम्रता येलोरे व ग्रामस्थयावेळी हजर होते महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते आभार सहकार्यक्रमअधिकारी डॉ. राजेश थोरवे यांनी मानले सहकार्यक्रमअधिकारी डॉ. नाथ मॅडम प्रा.वाघुले , प्रा श्रीमती कोल्हे मॅडम, श्री पेटकर श्री बेलेकर श्री खाडे आदींनी परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!