विहामांडवा (प्रतिनिधी)पैठण तालुक्यातील नवगाव येथील त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण मुख्याध्यापक उल्हास बेतवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कै.पंढरीनाथ पाटील शिसोदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेल्या क्रीडा सप्ताह मध्ये प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यात विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गीतांवर नृत्य सादर केले.तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत तसेच भाषण केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी शिफा शेख व जुनेरा शेख यांनी केले तसेच शिक्षक केदार सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्लास बेतवार, ए.व्ही केदार, एस.जे. पठाण, श्रीमती एस. खिंडारी, यु.बी. परळकर, एम.जे. रावस, डि.टी.डुकरे, आय. आय. शेख, नजीर खान आदींनी
परिश्रम घेतले.