spot_img
spot_img

गणेश वायकर यांच्यासह शेकडो तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पाथर्डी (प्रतिनिधी) :- तालुक्यातील माळी बाभूळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश वायकर यांनी आज सकाळी आपल्या शेकडो तरुण समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
आज सकाळी प्रतापराव ढाकणे यांच्या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी अनेक तरुण समर्थकांनीही प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना ढाकणे म्हणाले, गणेश वायकर व त्यांचे समर्थक आज अतिशय अस्वस्थ दिसत आहेत याला मूळ कारण म्हणजे तरुणांच्या हाताला काम नाही दिवसेंदिवस राज्य व देशातील बेरोजगारी वाढत आहे सरकार मात्र देखावा व भूल भुलैया वातावरण तयार करून तरुणांना त्यांच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित कसे होईल यासाठी प्रयत्नशील आहे. संपूर्ण देशात जात पंथ आणि धर्म या मुद्द्यावर आजच्या तरुणाईला लक्ष केंद्रित करण्यासाठी वेगळीच शक्ती कार्यरत आहे आज देशावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे तरुण मुले मुली सुशिक्षित असूनही धडपडत आहेत मागील साडेनऊ वर्षात भारतातील बेरोजगारीचा उच्चांक सर्वाधिक आहे. आज गणेश वायकर व तुम्ही सर्व तरुण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आपण समाजातील जबाबदार युवक आहात तुमच्या माध्यमातून तुमच्या इतर सहकाऱ्यांचेही तुम्ही प्रबोधन करून योग्य वाटचाल करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे असे आवाहन ढाकणे यांनी शेवटी केले.
गणेश वायकर बोलताना म्हणाले, मी पूर्वीपासूनच प्रतापराव ढाकणे व शरद पवार साहेब यांच्यावर निष्ठा बाळगून राजकीय जीवनात काम करत आलो आहे मात्र मध्यंतरी अशाच भूलथापांना बळी पडून माझ्या राजकीय जीवनात एक मोठी चूक केली त्याचे प्रायश्चित्त करून आज पुन्हा ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय भाजपमध्ये प्रवेश करून झालेली चूक आज दुरुस्त करून या पुढील काळात प्रतापराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुक्यात युवकांचे संघटन करून सध्याची राजकीय वस्तू स्थिती त्यांच्यापुढे मांडत आपण काम करणार आहोत.
यावेळी राहुल वायकर अक्षय वायकर किरण दिवटे रशीद शेख निलेश वायकर भारत भोईटे देविदास काळे शौकत शेख जलाल शेख सुनील कोलते बबलू भोसले अरबाज शेख अरबाज पठाण अजय भोसले राहुल तिजोरे महेश वायकर तेजस वायकर बबन भोईटे विशाल भोईटे चंद्रकांत कोलते गोरक्ष कोलते आदित्य वायकर शिवशंकर भोसले स्वप्निल भोसले शाहरुख शेख दीपक भोईटे आदित्य बेळगे यांच्यासह अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचे स्वागत प्रतापराव ढाकणे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे वैभव दहिफळे शहराध्यक्ष योगेश रासने देवा पवार आक्रम आतार आदींनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!