विहामांडवा (प्रतिनिधी) गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.शाळेचे ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. गुलदाद पठाण,संस्थेचे सचिव वाहेद पठाण, संचालक तोफीक पठाण तसेच पालक प्रतिनीधी म्हणून विजय साबळे श्रीमती. घोरपडे ताई तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खरड मॅडम उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आदरणीय वाहेद पठाण होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर गायकवाड, प्रास्ताविक श्रीमती खरड मॅडम तर आभार प्रदर्शन श्रीमती भोपळे सुनिता मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.