spot_img
spot_img

स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

विहामांडवा (प्रतिनिधी)पैठण तालुक्यातील आवडे उंचेगाव येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कुलयेथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मेजर परमेश्वर धर्मे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पैठण तालुकाध्यक्ष डॉ. गुलदाद पठाण हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कवायती बरोबरच मनोगत व्यक्त करून देशभक्तीपर गीते सादर केले.यावेळी मेजर परमेश्वर धर्मे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगून देशसेवेसाठी जीवन कसे उपयोगी आणता येईल याच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाचपुते,सचिव काकासाहेब पाचपुते पालक अभिजीत औटे, अफसर पठाण,राजू इनामदार,किशोर चव्हाण परमेश्वर मोरे, माणिकराव राऊत ,राजेंद्र राऊत ,जावेद पठाण, सादेक पठाण,राजू पठाण ,आदिल पठाण, दुष्यंत पवार,सहदेव राक्षे आप्पासाहेब डोके, काकासाहेब गवांदे इ. पालक उपस्थित होते.मुख्याध्यापक योगेश माने,सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा गायके शबाना अन्सारी,समीना शेख,योगीता गाडेकर, प्रेरणा राक्षे,रेश्मा पठाण इत्यादी सह अतुल गल्हाटे,लहू ढोले सचिन गवांदे ,बद्रीनाथ कोरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!