देवळाली (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील देवळाली येथील ज्ञानेश नंदिनी संचलित चैतन्य गोशाळेत महाराष्ट्र राज्याचे विभागीय प्रदुषण आयुक्त श्री दिलीप खेडकर रा.भालगाव ता.पाथर्डी यांनी श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त तीन टन चारा दान केला. इतरांनीही दिलीप खेडकर यांचा आदर्श घेऊन साधू संतांच्या पुण्यातीथी गो शाळेत साजरी कराव्यात असे प्रतिपादन ह.भ.प.अजिनाथ महाराज आंधळे यांनी चारा दान कार्यक्रम प्रसंगी केले यावेळी गजानन कुलकर्णी, नवनाथ तांदळे (मा.जि.प.सदस्य) वैभव पाठक आदी उपस्थित होते.या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.