कडा(प्रतिनिधी) श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या शिक्षण संस्थेचे शताब्दी महोत्सवानिमित्त दोन दिवशी अंतर विद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद हवामानातील बदल आणि आत्मनिर्भर भारतापुढील आव्हाने या विषयावर आयोजित करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हवामानातील बदल आणि जल व भू व्यवस्थापन या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर धाराशिव येथील जल व भूमी व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील यांनी भारतामध्ये भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपायोजना यावर विस्तृत मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास डॉ. बापू अवचर, डॉ. अंजली खिलारी, डॉ. स्वाती वाघ, डॉ. काकासाहेब पोकळे, डॉ. रघुनाथ विधाते, डॉ. रामदास कवडे, डॉ. नामदेव वाघुले, डॉ. युन्नुस सय्यद, डॉ विशाल वैदय, डॉ. संजय व्यवहारे, डॉ. सुदाम जाधव, प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी, उपप्राचार्य जवाहर भंडारी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. नितीन पाटील पुढे म्हणाले की, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्याद वापर त्याचप्रमाणे वाढते औद्योगिकीकरण व त्यासोबतच येणारे नागरिकीकरण त्यामुळे जागतिक स्तरावर हवामान बदलाची समस्या निर्माण झालेली आहे. हवामान बदलामुळे पावसाचे असमान वितरण समुद्रातील पाण्याच्या पातळीमध्ये होणारी वाढ व घटते जागतिक अन्नधान्य उत्पादन तसेच जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. समुद्रातील पाण्याची पातळी अंदाजे 50 ते 60 सेंटिमीटर इतकी वाढण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे, जगातील अनेक महत्त्वाची शहरे ही पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मानवाची जीवनशैली येणाऱ्या काळात बदलू शकते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश रसाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री सोमनाथ हसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. राधाकृष्ण जोशी डॉ. अमोल कल्याणकर, डॉ. शिवाजी जगदाळे, डॉ. प्रकाश जाधवर, डॉ. नवनाथ कराळे, डॉ. अरुणा कुलकर्णी, डॉ. धनश्री मुनोत यांनी प्रयत्न केले. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.