spot_img
spot_img

पर्यावरणातील प्रदूषण वेळीच रोखले नाही तर विघातक परिणामांना सामोरे जावे लागेल. :- प्रा. डॉ. के. एम. जाधव.

कडा (प्रतिनिधी) :- २१ व्या शतकातील औद्योगीकरणाच्या युगात पर्यावरणातील मृदा, जल, तसेच वायु चे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झाले आहे. हे प्रदूषण जर वेळीच रोखले नाही तर जगावर त्याचे अत्यंत विघातक परिणाम होतील. असा इशारा प्रा. डॉ. के. एम. जाधव यांनी दिला.

श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित हवामानातील बदल आणि आत्मनिर्भर भारता पुढील आव्हाने या विषयांवरील २ दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हवामानातील बदल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामावर सूक्ष्म तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावर ते बोलत होते. सय्यद अझरुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रास प्रा. डॉ. नंदकुमार राठी, हवामान तज्ञ डॉ. बी. एन. शिंदे, डॉ. सुरुची पांडे, डॉ. राधेश्याम प्रधान, डॉ. सुरेंद्र ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. के. एम. जाधव पुढे म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने फेराईट मटेरियल औद्योगिक सांड पाण्यामध्ये असणारे विषारी रंगद्रव्ये नाहीसे करण्यासाठी मदत करू शकतात तसेच संगणक, ऊर्जा निर्मिती, विद्युत उपकरणे, जैवतंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये फेराईट मटेरियल तयार करण्याच्या पद्धती आणि त्यांचे विविध उपयोग यावरही त्यांनी संशोधकांना प्रेरणादायी ठरेल असे मार्गदर्शन केले.

या चर्चा सत्राचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र गवळी व डॉ. धनश्री मुनोत यांनी केले तर प्रा. डॉ. अरुणा कुलकर्णी यांनी आभार मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!