spot_img
spot_img

गांधी महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वातावरण बदल व त्यामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर पन्नासच्यावर शोधनिबंध सादर.

कडा(वार्ताहर)गांधी महाविद्यालयात यावेळी तीन वेगवेगळ्या दालनांमध्ये वेगवेगळ्या विद्याशाखेचे प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केले. यामध्ये शास्त्र विभागामध्ये डॉ. नितीन पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद यांनी जल व भू व्यवस्थापन या विषया वर विस्तृत मार्गदर्शन केले. प्रा. तादळे प्रशांत अमोलक बी फार्मसी कॉलेज, वातावरणातील बदलामुळे शरीरात होणाऱ्या कॅन्सरच्या वाढी व त्यावरील उपाय यावर संशोधन सादर केले. डॉ. अंजली खिलारी, राधाबाई काळे महाविद्यालय अहमदनगर यांनी वनस्पतीशास्त्रातील नावीन्य व एनईपी होणारे बदल, तर डॉ. अवचर बापू, प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती यांनी वनस्पतीशास्त्र व त्यातील बीजारोपणाच्या विविध पद्धती यावर संशोधन सादर केले. यामध्ये सुजाता बडे, शाहीन सय्यद, रसिका जिने, चौगुले एस.पी., डॉ. स्वाती वाघ व इतर अनेक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश रसाळ यांनी तर आभार डॉ. नरेंद्र गवळी यांनी मानले.

भाषा व सामाजिक शास्त्र विभागातून डॉ. सज्जन गायकवाड, डॉ. गुलाबराव मंडलिक, डॉ. गोपीनाथ बोडखे, रसिका झिने, सुधीर वनवे, चौगुले एस. पी. व इतर अनेक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर काकासाहेब पोकळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वाल्मीक गर्जे व डॉ. मनोज सोमवंशी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इन्नुस सय्यद यांनी तर आभार डॉ. तुकाराम गोंदकर यांनी मानले.

वाणिज्य विभागातून डॉ. पंकज पंडागळे, टि. के. टोपे, परळ मुंबई यांनी डिजिटल रिटर्न बँकिंग वर तसेच डॉ. अंकुश पाडले, श्री संजय दराडे, अॅफरोज पठाण, तोडकरी अनुष्का, डॉ. सोनवणे सतीश, पूजा धनवटे, कुरेशी शेख, संकेत गांधी यांनी शोधनिबंध सादर केले. यावेळी डॉ. प्रकाश रोडीया, डॉ. आशिष गट्टानी, डॉ. उबेद मेनन, डॉ. श्रीरंग खिलारे, डॉ. उमेश कुमार मालपाणी, यांनी संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप श्रॉफ कॉलेज मुंबईच्या प्राचार्या डॉ. रंजना यवागल यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक कोरडे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. मीरा नाथ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी साठी प्रा. सोमनाथ हसे प्रा.डाँ. राजकुमार थोरवे ,सुनिल लोमटे यांनी प्रयत्न केले.

पोस्टर सादरीकरण सत्रा चे उद्घाटन डॉ राजेश शिंदे, डायरेक्टर सब सेंटर नांदेड विद्यापीठ, डॉ.आनंद वाघ, संचालक व निरंतर विभाग डॉ.बा. आं. म. वि. संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ.राजेश करपे, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य डॉ.एन. एस. राठी, उपप्राचार्य डॉ.भंडारी जवाहरलाल हे होते. याप्रसंगी एकूण 33 पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये प्रा. डॉ.आर जी विधाते प्रा डॉ. कवडे प्रा.डॉ.जे एम भंडारी डॉ. एस आर देशमुख शुभम लोमटे वैशाली भालेराव, विश्वास जायभाय, प्रा.डॉ. मंगेश खराडे
प्रा.डॉ अनिल शेळके,प्रा. डॉ शिरसाठ सर यांनी प्रत्यक्ष विश्लेषण करून पाहुण्यांना माहिती दिली. पोस्टर प्रेझेंटेशन चे प्रथम मांनाकन प्रा. डॉ.आर जी विधाते यांना देण्यात आले. या सत्राचे सर्व नियोजन प्रा डॉ. रमेश आबदार प्रा डॉ. सुपर्णा देशमुख यांनी केले तसेच प्रा डॉ.सुदाम जाधव प्रा डॉ.विशाल वैद्य, डॉ. तुकाराम गोंदकर प्रा डॉ.योगेश रसाळ यांनी या सत्राला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!