कडा (प्रतिनिधी) :- श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित अमोलक फेस्टिवलमध्ये संस्थेच्या विविध शाखातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी गणपती गीते, मराठी संस्कृती, मराठी हिंदी चित्रपट गीते, लावणी, रिमिक्स, फ्युजन नृत्य, विनोदी प्रहसन, व प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची शाबासकी मिळवली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, कार्याध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, उपाध्यक्ष बिपिन भंडारी, प्रधानमंत्री हेमंत पोखरणा, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, विश्वस्त बाबुलाल भंडारी, कार्यकारी सदस्य प्रफुल्ल पोखरणा, संजय मेहेर, संतोष भंडारी, अजय चोरबेले, योगेश चानोदिया, ललित कटारिया, संतोष शिंगवी, सरपंच युवराज पाटील, भीमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड, आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, एअर फोर्सचे कॅप्टन अमोल नाथ यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अमोलक युनिव्हर्सलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राम राम राम ओम साई राम या गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर मुझे माफ करना ओम साई राम, छत्रपती शिवाजी महाराज, एकदंताय वक्रतुंडाय, मराठी बाणा, दाक्षिणात्य गीत, संगीत, लेझी डान्स, हिंदी चित्रपट गीत, लावण्या, रिमिक्स, फ्युजन नृत्य, विनोदी प्रहसन, गोविंदा स्पेशल, सिंघम स्पेशल आणि प्रभू श्री रामाचा जयजयकार करणारी गीते सादर झाली. बाल विवाह प्रतिबंधक प्रबोधन कार्यक्रम सादर झाला.
या कार्यक्रमात संस्थेच्या बालवाडी, चंदनमल भळगट प्राथमिक शाळा, मोतीलाल कोठारी विद्यालय, पी. एम. मुनोत कॉलेज, डी फार्मसी, बी. फार्मसी, गांधी महाविद्यालयाचा बी. सी. ए. विभाग अशा विविध विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उस्फूर्तपणे दाद दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गोले, रंजना जोशी, पुष्पा जरे, गजगौरी हिंगणे, पुजा बोरा, सुप्रिया महामुनी, सुजाता वेद पाठक , संगीता कुलकर्णी, प्राचार्य महेश म्हस्के, प्रा. सुजाता गरुड, प्रा. पल्लवी कर्डिले, प्रा. महेश क्षिरसागर , प्रा. माया महाडीक यांनी आपापल्या विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी यांनी समाज माध्यम प्रसिद्धी ची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. संस्थेच्या विविध शाखेच्या प्रमुखांना आपापल्या विभागाची माहिती सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रशांत तांदळे, प्रा. आकाश काळे, प्रा. अर्शद सय्यद, प्रा. वंदना कोल्हे, प्रा. निलेश गांधी, प्रा. शशिकांत देशपांडे, सागर थोरात, अरूणा चौधरी, गणेश रावळ, प्रा. आशिष कटारिया, डॉ. सुदाम जाधव, संजय नाथ, संदीप चव्हाण, प्रा. दादासाहेब तोरडमल, पुष्पलता जरे, रंजूबाला जाजडा, जयप्रकाश पोतदार, माधुरी दहिवले, खुर्शिद सय्यद, संगीता कुलकर्णी, सतीश चोरडिया, महेंद्र पेटकर, दिपक गुगळे, संतोष गुगळे, राम ससाणे, मुकुंद बेलेकर, संतोष गोडसे, निखिल कस्तुरे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास साई मंडप डेकोरेटर्स चे राजेश झांबरे यांचे मंडप, डेकोरेशन, सजावट, ध्वनी व प्रकाश योजना, फॉग मशीन, ब्लोअर मशीन सेवा लाभली. संतोष तोडकर यांचे कोल्ड फायर, रंगीबेरंगी आकर्षक फटाक्यांची आतिषबाजीची सेवा लाभली.
➡️:- गांधी महाविद्यालयाच्या बास्केटबॉल मैदानाजवळ उभारण्यात आलेल्या आय लव अमोलक या सेल्फी पॉइंटवर बाल गोपळांसह युवक, युवती, शिक्षक, शिक्षिका व प्राध्यापकांनी सेल्फीचा आनंद लुटला.