कडा (प्रतिनिधी) :- भारतात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आम आदमी पार्टीने आष्टी तालुक्यातील प्रदिप गणपतराव थोरवे यांची राज्य युवा आघाडीच्या प्रदेश संघटनमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे पंजाब, गोवा, गुजरात मध्ये देखील पक्षाला मोठे यश मिळाले असून त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.संदीप पाठक, महाराष्ट्र प्रभारी दिपक सिंघला,राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालीया, युवक प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर व प्रदेश सचिव प्राजक्ता देशमुख यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे प्रदिप थोरवे यांची राज्य युवा आघाडीच्या संघटन मंत्री पदी नेमणूक केल्याची घोषणा केली आहे. प्रदीप थोरवे हे सध्या बीड जिल्हा युवक उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असतांना त्यांनी बीड,अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर सह पुणे जिल्ह्यांमध्ये युवकांचे संघटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे विविध प्रश्न, सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रश्न, वैद्यकीय मदत,गोरगरीबांची प्रश्न सोडविण्यासाठी सतत रस्त्यावरची लढाई लढत असतात व सरकारी अधिकाऱ्यांकडून काम करुन घेऊन लोक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी पक्षाच कार्य जिल्हाच्या प्रत्येक गावातील कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी सतत प्रयत्न करून पार्टीचे काम करण्याचं कार्य केलं. संपूर्ण देशात एकूण २३०० पेक्षा जास्त राजकीय पक्षांना मागे टाकुन देशात ३ नंबरचा राजकीय पक्ष बनलेल्या व जगात सर्वात वेगाने वाढणारा एकमेव पक्ष म्हनजेच आम आदमी पार्टी, आणि याच बलाढ्य पक्षाने थोरवे यांना महाराष्ट्राच्या युवक प्रदेश संघटन मंत्री पदाची जबाबदारी दिली. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी हे महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत आम आदमी पार्टीची ध्येय ,धोरणे तसेच दिल्ली आणि पंजाब मधील जनहितासाठी केलेल्या कामांची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवितील, तसेच राज्याच्या प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात लोकांच्या समस्या सोडविण्याचे आटोकाट प्रयत्न करतील, भ्रष्टाचाराविरोधात पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील व युवकांना संघटीत करण्यासाठी ते निश्चित मेहनत घेतील असा विश्वास राज्यभरातील जनतेकडून व्यक्त होत आहे. व त्यांच्यावर सोपवलेल्या राज्याच्या मोठ्या जबाबदारी दिल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे