कडा (प्रतिनिधी) :- श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून श्री अमोलक ऋषीजी महाराजांनी कड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा आणली त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी, कष्टकरी, ऊस तोडणी कामगार व गोरगरिबांची मुले शिकली आणि त्यांचे उज्वल भविष्य घडले. या संस्थेने १०० वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण केलेली आहे आणि या संस्थेचा शताब्दी महोत्सव आज या ठिकाणी साजरा होत आहे. त्याबद्दल मी या संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो अशा शब्दात आ. सुरेश आण्णा धस यांनी शुभेच्छा दिल्या.
श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवा निमित्त गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, कार्याध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, उपाध्यक्ष बिपिन भंडारी, प्रधानमंत्री हेमंत पोखरणा, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, विश्वस्त बाबुलाल भंडारी, कार्यकारी सदस्य प्रफुल्ल पोखरणा, संजय मेहेर, संतोष भंडारी, संतोष गांधी, संजय भंडारी, अजय चोरबेले, प्रमोद भळगट, योगेश चानोदिया, ललित कटारिया, सरपंच युवराज पाटील, रमजान तांबोळी, अनिल ढोबळे, गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी न्यायाधीश प्रितेश भंडारी, प्राचार्य शाकीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री अमोलक ऋषीजी महाराज साहेब, कलेची देवता नटराज व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी आयोजित अमोलक फेस्टिवल मध्ये विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी अप्रतिम असे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.
बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एक तरी मोदक खा ना गणुल्या या गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवकार मंत्र, मर्द मराठा, पोरी पिंगा रे पिंगा, पुष्पा रिमिक्स, माधुरी रिमिक्स व गणपती गीत सादर केले. अमोलक युनिव्हर्सल च्या विद्यार्थ्यांनी फाईव्ह लिटल फिंगर्स, चेन्नई एक्सप्रेस, कपल डान्स, झाशीची राणी इत्यादी कार्यक्रम सादर केले. चंदमल भळगट प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी माय भवानी, हवा हवाई, रांगिलो म्हारो ढोल, राधा तेरी चुनरी इत्यादी नृत्यावर धमाल नृत्य सादर केले. पी. एम. मुनोत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आस्ते कदम व गोंधळ गीत सादर केले. बी. फार्म च्या विद्यार्थी विद्यार्थिनीने मॅशप गीत सादर केले. महिला सक्षमीकरण, व फॅशन शो सादर केला. तर डी. फार्म च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी जागरण गोंधळ, शिवाजी महाराज रिमिक्स गीत सादर केले. गांधी महाविद्यालयाच्या बी. सी. ए. विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी लेझी डान्स, फ्युजन डान्स सादर केला.
या कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उस्फूर्तपणे दाद दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गोले, रंजना जोशी, पुष्पा जरे, गजगौरी हिंगणे, पुजा बोरा, सुप्रिया महामुनी, सुजाता वेद पाठक , संगीता कुलकर्णी, प्राचार्य महेश म्हस्के, प्रा. सुजाता गरुड, प्रा. पल्लवी कर्डिले, प्रा. महेश क्षिरसागर , प्रा. माया महाडीक यांनी आपापल्या विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. राधाकृष्ण जोशी यांनी समाज माध्यम प्रसिद्धी ची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, उपप्राचार्य डॉ. जवाहर भंडारी, प्रशासकीय अधिकारी नवनाथ पडोळे, मुख्याध्यापक मथाजी शिकारे, प्राचार्य गफ्फर सय्यद, शोभाचंद ललवाणी, अरूणा शिंदे, मोहसीन पठाण, संदीप जाधव, प्रकाश सरडे, वैभव परजने, डाँ.शिवराज पातळेडॉ. रमेश अब्दार, डॉ. योगेश रसाळ व सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनींचे पालक व कडा पंच क्रोशितील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.