धामणगाव (प्रतिनिधी)
पो.स्टे. अंभोरा हद्दीत मौजे शेडाळा, ता. आष्टी येथे दि.०८/०१/२०२४ रोजी पोलीस उन्नती दिन सप्ताहाची सांगता जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून केली.
प्रथम सपोनि.महादेव ढाकणे, पोशि/अमोल शिरसाट व बाळासाहेब जगदाळे सह अधिकार्यानी शासकीय जीपसह शाळेच्या परिसरात प्रवेश करताच कधीही पोलीस व त्यांच्याकडील आधुनिक शस्त्रे न पाहिलेले ग्रामीण भागातील शाळकरी मुले खुपच आनंदित झाले, काही लहानगी मुले तर पोलीस पाहूनच घाबरली व रडू लागले. त्यावेळी सपोनि.महादेव ढाकणे यांनी त्यांची भिती दुर करून पोलीस व पोलिसांची कार्यपद्धती याची सर्व माहीती विद्यार्थ्यांना दिली. तसेच पोलीसांकडील शस्त्रे त्यांना हाताळण्यास दिली. तसेच मुलांमधील पोलिसांबद्दलची भिती कमी करून पोलीस आपले शत्रु नसून मित्र आहेत, जे लोक चुकीचे काम करतात त्यांनाच कायद्याच्या माध्यमातून शिस्त लावण्याचे काम पोलीस करीत असल्याचे सपोनि.महादेव ढाकणे यांनी सांगितले .यावेळी गावच्या महिला सरपंच मोबिना शेख, मुख्याध्यापक श्री अकोलकर सर, सहशिक्षक श्री आमले, गर्जे, श्रीमती नवले, ढोले यांच्यासह प्रतिष्ठित नागरीक व विद्यार्थी हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस शाळेतील विद्यार्थ्यांनी सपोनि.महादेव ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे फुलांची उधळण करून व स्वागत गीत गाऊन स्वागत केले. पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की मला 40 वर्षापूर्वीचे जि.प. प्राथमिक शाळेतील दिवस आठवल्याचे सांगुन त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.