पाथर्डी (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस तसेच सौ.लक्ष्मीबाई शांताराम डोके समाज विकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब डोके यांच्या वाढदिवसानिमित्त न्यु इंग्लिश स्कूल आल्हणवाडी ता.पाथर्डी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आल्हणवाडी येथील डॉ.फुंदे
पी.पी., डॉ.बडे एस.एस., यांच्या मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसह आयुष्यमान भारत गोल्डन इ कॅंम आयोजित करण्यात आला.
यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची तपासणी केली. यामध्ये हाडांची तपासणी, रक्तदाब, कान, नाक, घसा इ.तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आयोजक मुख्याध्यापक दहातोंडे सर म्हणाले, ” ऐन्शी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या डोके साहेबांच्या उक्तीप्रमाणे आम्ही काम करीत आहोत. इतर कोणतेही भपकेबाज कार्यक्रम न करता विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी आज आम्ही मा..बापूसाहेब डोके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली. या आधीही असे सामाजिक उपक्रम राबवित आलो आहोत आणि भविष्यातही आणखी समाज उपयोगी कार्यक्रम बापूसाहेब डोके यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत.
यावेळी डॉ.फुंदे पी.पी., डॉ.बडे एस.एस.शाळेचे मुख्याध्यापक दहातोंडे सर, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी, विद्यार्थ्यी उपस्थित होते.