अहमदनगर(प्रतिनिधी)- वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी शब्दगंध च्या नेवासा शाखेने सुरू केलेला फिरत्या वाचनालयाचा उपक्रम प्रभावशाली असून वाढदिवसानिमित्त पुस्तकं जमा करून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत, असे सर्वत्र झाले तर वाचन संस्कृती निश्चितच वाढेल,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मधुसूदन मुळे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या वाढदिवसानिमित्त फिरत्या वाचनालया करिता पुस्तकं जमा करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे,कवी चंद्रकात पालवे,प्रा.मेघाताई काळे, शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी हे होते.
यावेळी पुढें बोलतांना प्रा. मधुसूदन मुळे म्हणाले की, जो माणूस जास्त हसतो, कमी बोलतो त्याच्या पाठीमागे काहीतरी दुःखदर्द असते, ते तो समाजाला दाखवत नाही. आपला आनंद हाच समाजाला सातत्याने दाखवत असतो अशी माणसे मोठ्या मनाची असतात.
प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे बोलताना म्हणाले की, प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेले राजाभाऊच्या वाढदिवसानिमित्त विचारांचा वारसा वाढवण्यासाठी पुस्तक देऊन त्यांचा सत्कार सर्वजण करत आहेत,ही आनंददायी गोष्ट आहे.
कवी चंद्रकांत पालवे बोलताना म्हणाले की शब्दगंध ची दिनदर्शिका सर्वांसाठी प्रेरणादायी असून सातत्याने ती प्रकाशित होत आहे ही सभासदांसाठी आनंद देणारी बाब आहे.
प्रा.मेधाताई काळे यांनी संघर्षातून तयार होणारी माणसे समाजासाठी काहीतरी सातत्याने करत असतात. शब्दगंध मधील सर्वच कार्यकर्ते अशा प्रकारची असल्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात.
सुनील गोसावी यांनी सर्वांचे स्वागत करुन पुढील उपक्रमांची माहिती दिली.यावेळी राजेंद्र फंड, सुभाष सोनवणे, प्रा.डॉ.अनिल गर्जे, राजेंद्र चोभे,दशरथ खोसे,स्वाती ठुबे, संतोष कानडे, सरोज आल्हाट डॉ.रमेश वाघमारे,ॲड. सुनील कात्रे, अरूण आहेर, बबनराव गिरी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले. यावेळी राजेंद्र उदागे यांनी सर्वांनी पुस्तकं दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास सप्तरंगचे अध्यक्ष डॉ.श्याम शिंदे,अजित अमर,भगवान राऊत, देविदास आंगरख, सत्यप्रेम गिरी, सुरेखा घोलप, ज्योती वाघमारे, जयश्री मंडलिक, संगिता गिरी, मकरंद घोडके, डॉ तुकाराम गोंदकर, राम खुडे, सुरेखा घोलप, सागर अधापुरे, अजित वाघमारे, मिरा आर्ले,कल्पना हरनामे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शब्दगंध दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले.