spot_img
spot_img

शेरी बु !! येथिल ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प रघुनाथ महाराज धामणगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनानी सांगता…

कडा (प्रतिनिधी):- आष्टी तालुक्यातील शेरी बु येथे श्री श्रेत्रिय ब्राम्हनिष्ठ सद्गुरू श्री संत मदन महाराजांनी सुरू केलेल्या ३९व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या सात दिवसापासून अतिशय मंगलमय वभक्तिमय वातावरणात दररोज सायंकाळी नामांकित महाराजांनी आपल्या मार्मिकपणे आपले हरिनाम कीर्तनाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील भाविकांना अध्यामिक व सामाजिक जीवनात आपण कसे राहिले पाहिजे याचा मूल्यमंत्र देऊन समाजप्रबोधनाचे कार्य अतिशय उत्तम प्रकारे केले या सप्तहाची सांगता अतिशय भक्तिमय वातावरणात मंगळवारी दि.२ यादिवशी सकाळी भव्यदिव्य दिंडी प्रदक्षिणा काढली व ह.भ.प रघुनाथ महाराज धामणगावकर यांनी आजच्या कालाच्या हरि कीर्तनात समाज प्रबोधन करतांना सांगितले की, श्री क्षेत्रिय ब्रम्हनिष्ठ श्री संत मदन महाराज यांना सर्व प्रथम या गावात सर्वात अगोदर मी आणि वैकुंठवाशी रंगनाथ महाराज यांनी आपल्या गावात आणले अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला तेव्हापासून आजपर्यंत या गावात अतिशय उत्तमप्रकारे अखंड हरिनाम सप्तहाची सुरूवात झाली आहे. याठिकाणी बोलताना सांगितले की, माणसांला ह्या जगात माणूस म्हणून ओळख आहे त्यामुळे सर्वांनी माणूस म्हणून जगले पाहिजे आपल्या जीवनात जगतांना परोपकारी जीवन जगले पाहिजे कारण या जन्मात सोबत काहीच घेऊन जाता येत नाही सर्व गोष्टी इथंच ठेऊन जावे लागते त्यामुळे सोबत काही नेयचे असेल तर हरिनानाचा गजर करून पुण्याचा पार घेऊन जा असा मोलाचा संदेश दिला आहे जीवनामध्ये आपली पिढी सुसंस्कृत होईल यासाठी माता भगिनींनी विशेष लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या घरात व समाजात सुसंकृत पिढी कशी निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे, हिंदू संस्कृती आणि धर्म जपला पाहिजे अन हिंदू संस्कृती ही जगात सर्वात श्रेष्ठ संस्कृती असून मध्ये घरात आई अंगणात गाईची सेवा केली पाहिजे, गावातील तरुणांनी पूर्वीप्रमाणे खेळ खेळावे , शारीरिक व्यायाम करावा त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहील याची दक्षता घ्यावी, हा हरिनाम सप्ताहा म्हणजे साधी गोष्ट नाही तर हा एक मोठा सोहळा आहे आणि हा सोहळा लोकसोहळा झाला पाहिजे ह्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे यावेळी सामाजिक कार्यकर्ते युवानेते संदीप खाकाळ, शिवक्रांतीचे प्रदेशाध्यक्ष दिपक सोनवणे, हभप कारभारी धस, हभप सुभाष सोनवणे, भोसले महाराज,हभप ज्ञानेश्वर भालेकर , काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रविकाका ढोबळे, काकासाहेब कर्डीले, डॉ उद्धव सोनवणे, यज्ञ ह.भ.प भगवान वाघुले, दत्ता बागल,शरद रासकर, रमेश भालेकर, बाळासाहेब वाघुले,डॉ. बाळासाहेब धाडगे, बाळासाहेब राऊत, पंडित महाडिक, अजिनाथ महाडीक, सामाजिक, राजकिय, धार्मिक, व्यापारी सह शेरी बु खाकाळवाडी, वटनवाडी, जळगाव अन पंचक्रोशीतील माता भगिनी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या हरिनाम सप्तहासाठी अनेक दानशूर व्यक्तीने गेल्या आठ दिवसापासून अन्नदान केले तर पिण्यासाठी पाणी पुरवठा तात्या सोनवणे, ईश्वर सोनवणे, नितीन राऊत यांनी केले तर संभाजी सोनवणे, अमोल सोनवणे अन्नदान केले तर(लाईट) सोय राजू रासकर यांनी केली

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!