spot_img
spot_img

किरण शिनगीरे यांचा नॅशनल आयकॉन अवार्ड या राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथे सन्मान

धामणगाव(प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे गांधी महाविद्यालयाचे मा.जनरल सेक्रेटरी (जी.एस.) किरण भगवानराव शिनगीरे यांचा भारतीय युवा वेल्फेअर असोसिएशन कडून नॅशनल आयकॉन अवॉर्ड या पुरस्काराने जगदंबिका पाल माजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेश तथा लोकसभा सदस्य, जय प्रताप सिंग माजी आरोग्य मंत्री उत्तर प्रदेश, एडी सिंग बॉलीवूड डायरेक्टर, रवी किसन सिनेअभिनेता, मोहित नारायण अध्यक्ष भारतीय युवा वेल्फेअर असोसिएशन यांच्या हस्ते दिल्ली येथे सन्मान करण्यात आला.
किरण शिनगीरे यांनी सन 2019 -20 यावर्षी युवकांचे संघटन करून वटणवाडी तालुका आष्टी येथे गांधी महाविद्यालयाचा गावात 7 दिवस कॅम्प घेऊन वृक्षारोपण केले ,स्वच्छता मोहीम राबवली. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ श्रमदानातून बंधारा तयार केला. पाण्याचे जल व्यवस्थापन कसे करावे? याबाबत तज्ञांकडून गावात युवक व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच जलसंवर्धनासाठी युवकांचे योगदान, ग्रामसमृद्धी मध्ये महिलांचे योगदान, विज्ञान विकास,अध्यात्म व विकास, कवी संमेलन याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण जागृती, ग्रामस्वच्छता, मतदानाचा हक्काविषयी जनजागृती केली, बेटी बचाओ बेटी पढाओ, जलसाक्षरता, अंधश्रद्धानिर्मूलन इत्यादी. तसेच मंदिर व शाळा परिसरात वृक्षारोपण केले.
यापुढील कोरोना च्या काळात कोरोना विषयी जनजागृती केली, त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, मोफत धान्य वाटप, आर्सेनिक गोळ्यांचे वाटप, संतूर व डेटॉल साबणचे वाटप, इत्यादी वस्तूंचे वाटप केले, बचत गटाविषयी जनजागृती, लसीकरण मोहीमेत सक्रिय सहभाग, आभा कार्ड विषयी जनजागृती इत्यादी कार्य केले. त्यापुढील काळात पुन्हा गांधी महाविद्यालयाचा वटनवाडी या गावात सात दिवस कॅम्प घेऊन त्यामध्ये विविध कार्य केले. तसेच पुढील काळात मौजे देवी-निमगाव येथे कॅम्पमध्ये प्लास्टिक मुक्ती मोहीम, ग्राम स्वच्छता, मतदानाविषयी जनजागृती इत्यादी कार्य केले.
या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना दिल्ली येथे बी.वाय.डब्ल्यू.ए. कडून दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहिर करण्यात आले होते. त्यामध्ये वर्ष २०२३ किरण शिनगीरे यांना *राष्ट्रीय नॅशनल आयकॉन अवॉर्ड* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना यापूर्वीही राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्काराने जि.अकोला, राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाज रत्न पुरस्कार नाशिक, राज्यस्तरीय यशवंत रत्न पुरस्कार बीड येथे, पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेश शेठ भंडारी, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदासजी मेहेर, कार्याध्यक्ष कांतिलालजी चानोदिया, सचिव हेमंत शेठ पोखरना, कोषाध्यक्ष डॉ.उमेशजी गांधी, डॉ. महेंद्र पटवा,
माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे, चेअरमन भगवान दादा शिनगीरे, झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामशेठ मधुरकर, गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नंदकुमार राठी, उपप्राचार्य भंडारी ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.विष्णू गव्हाणे, प्रा.डॉ.नरेंद्र गवळी, प्रा.सोमनाथ हासे, प्रा.डॉ.शिवाजी जगदाळे, प्रा.कल्याणकर , प्रा.डॉ.तुकारम गोंदकर, प्रा.किशोर कोईनकर, प्रा.कराळे प्रा.तळेकर, प्रा.डॉ.अरुणा कुलकर्णी मॅडम, प्रा.डॉ.धनश्री मुनोत मॅडम, प्रा.डॉ.मीरा नाथ मॅडम, सह आदी प्राध्यापक, सरपंच सतीशशेठ धस, विकास म्हस्के, पत्रकार अविनाश कदम ,पत्रकार प्रवीण पोकळे, शरद तळेकर, शरद रेडेकर, यशवंत हंबर्डे,अक्षय विधाते, अतुल जवणे, दादा पवळ, समीर शेख,अशोक मुटकुळे, विठ्ठल काकडे, राम देशमुख, जी.एस.मित्रपरिवार सह विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी व आष्टी तालुक्यातील विविध संघटनेने ही त्यांचे अभिनंदन केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!