धामणगाव (प्रतिनिधी )धामणगाव सह परिसरातील वस्त्यांवर घरफोडी, डिझेल चोरी.जनावरे चोरीच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या आहेत . आता विहिरीवरील मोटार चोरीच्या घटना घडू लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. गेल्या आठवड्यात सुमारे दहा ते पंधरा मोटार पंप चोरीला गेल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. इकबाल शेख यांच्या विहिरील मोटर चोरीला गेली आहे. तर धामणेश्वर पेट्रोल पंपावर लावलेल्या ट्रक मधून अंदाजे 27 हजार रुपयाचे डिझेल चोरीला गेले आहे. अंभोरा पोलिसांचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर बसत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात होत आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील धामणगाव लगतच्या विहिरीवरील पाणबुडी मोटार, इंजिन, डिझेल असे साहित्य चोरून नेले जात आहे. गेल्या काही दिवसांत विहिरीवरील मोटार चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. अंभोरा पोलिसांनी या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा नसता एस पी साहेबांकडे तक्रार केली जाईल असा इशारा धामणगाव चे सरपंच मनोज शेठ गाढवे यांनी दिला आहे….
…………………………………
आमच्याकडे अजुन अश्या प्रकारची कसलीही तक्रार आली नाही. अशी तक्रार आल्यास योग्य तो तपास करुन कारवाही केली जाईल.
महादेवजी ढाकणे साहेब
पोलीस निरीक्षक अंभोरा पोलीस स्टेशन