पाथर्डी (प्रतिनिधी):-शहरातील श्री स्वामी समर्थ विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन अर्थातच गॅदरिंगचा कार्यक्रम सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पाथर्डी शहरातील कै. माधवराव निऱ्हाळी खुल्या नाट्यगृहात आयोजित या शानदार स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रसाद मते, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप भांडकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर इजारे, संस्थेचे सह सचिव आनंदकुमार चोरडिया, मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांच्यासह पालक व हजारो प्रेक्षक उपस्थित होते.
रंगीबेरंगी वेशभूषाने नटलेल्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थित मान्यवर मंत्रमुग्ध झाले, विद्यार्थ्यांच्या गणेश वंदनेने स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पैसा पैसा या गीतावरील नृत्य अविष्काराला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले तानाजी मालुसरे यांच्या जीवनपट उलगडणारे गीत, हॉरर सिन गाण्यावर प्रेक्षकांनी तर विशेष दाद दिली. तानाजीचे बालपण ते गड आला पण सिंह गेला अर्थातच कोंढाणा किल्ला जिंकन्या पर्यंतचा जीवनपट आणि कहाणी या चिमुकल्यांनी प्रभावीपणे मांडल्या, उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली. शोकसभा या भन्नाटकॉमेडी नाटकाने तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले. पाहूणे जेवला का? या लावणी नृत्यविष्काराने उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. गोविंदा, पुष्पा वरील गाण्याने सर्वांची मने जिंकली.
वंदे मातरम तथा ऑल इंडिया कल्चर या गाण्याचे सादरीकरण करत विद्याथ्यांनी विविधतेतून एकतेचा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोनाली सोनवणे, प्रविणा गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, आत्माराम साबळे, सुरज आव्हाड, वैशाली घायाळ, सचिन गवळी, सुनिता गोसावी, सायली डांगे, ज्योती जेधे कृष्णा होनमणे, अनिकेत झेंड आदींनी विशेष परिश्रम घेतले.