spot_img
spot_img

51 वे पाथर्डी तालुका विज्ञान – गणित प्रदर्शन विवेकानंद विद्यामंदिर येथे : – गटशिक्षणाधिकारी अनिल भवार

पाथर्डी (प्रतिनिधी) :- शिक्षण विभाग पंचायत समिती पाथर्डी व विज्ञान – गणित अध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 51 वे तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन शहरातील विवेकानंद विद्यालयात दि. २१ डिसें.ते २३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांनी दिली . सदर प्रदर्शनासाठी आरोग्य, जीवन,शेती, कृषी, दळणवळण आणि वाहतूक, संगणकीय विचार व गणितीय प्रतिकृती हे प्रमुख विषय आहेत. सदर प्रदर्शनामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी जि . प . प्रा . शाळा प्राथमिक गट तसेच खाजगी प्राथमिक गट स्वतंत्र असून इयत्ता सहावी ते आठवी , इयत्ता नववी ते बारावी विज्ञान व गणित गट तसेच प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा परिचर असे विविध गटानुसार प्रतिकृतींची मांडणी केली जाणार आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार 21 डिसेंबर रोजी सकाळी होणार असून पारितोषिक वितरण समारोह शनीवारी 23 डिसेंबर रोजी दुपारी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार डॉ. सुजय विखे पाटील भुषविणार असून आमदार मोनिकाताई राजळे यांच्या शुभहस्ते व आमदार प्राजक्ता तनपुरे व मा.नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारीतोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे . प्रदर्शनामध्ये सहभागी सर्व उपकरणांचे परीक्षण करून सर्व यशस्वी वैज्ञानिकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना देखील सदर प्रदर्शनात मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन शिक्षण विभाग पाथर्डी व गणित विज्ञान अध्यापक संघ पाथर्डी च्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनास भेट देण्यासाठी तालुक्यातील मान्यवर ,शासकीय अधिकारी यांना निमंत्रण देण्यात आलेले असून तालुक्यातील सर्व शाळांना देखील प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी सहलीचे आयोजन करण्यास सूचवलेले आहे .सदर प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी अनिल भवार , अभय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विवेकानंद विद्या मंदिर चे मुख्याध्यापक शरद मेढे , पर्यवेक्षक संपत घारे , समन्वयक ज्ञानेश्वर गायके ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विज्ञान अध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील कटारिया, गणित अध्यापक संघटनेचे अध्यक्ष राजू पवार तसेच संघटनेचे पदाधिकारी आदिनाथ शिदोरे, चंद्रकांत उदागे, रमेश काकडे, संतोष लोहाडे,श्रीमती शितल भालसिंग, योगेश चन्ने, धर्मराज शिरसाट, सुनील शिरसाट, सुभाष सोनवणे हे परिश्रम घेत आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!