आष्टी(अविनाश कदम)
अहमदनगर शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या रेणुका पुंड याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षापदी आ संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवड करण्यात आली.
अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला ओबीसी जिल्हाध्यक्षापदी सामाजिक कार्यकर्ता रेणुका पुंड यांची राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खा सुनिलजी तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार संग्राम भैय्या जगताप यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल.पक्ष बळकटीसाठी व महिला संघटन मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध महिला सेलच्या पदाधिकारी यांच्या हि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी अहमदनगर येथे आ संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन निवडी करण्यात आल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक ॲड जयश्री पालवे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, युवकचे शहर अध्यक्ष केतन क्षिरसागर, युवकचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, सोशल मिडियाचे शहर अध्यक्ष मारुती पवार व शहराच्या युवतीच्या अध्यक्षा अंजली आव्हाड व आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या निवडीबद्दल रेणुका पुंड यांचे सर्व स्तरातून स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.