कडा (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील शेरी बु !! येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विजेच्या लपंडावामुळे निर्माण झाला होता तो कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी वनराई व एल.अँड टी. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस च्या माध्यमातून सौरऊर्जा पंप बसविण्यात आला असून त्याचे उदघाटन होणार आहे तसेच जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे` ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. सद्य परिस्थितीत आपल्या जमिनीचा आणि निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. जमिनीतील अन्नद्रव्याचे संतुलन पुर्णपणे बिघडून गेले आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्यवर होत असून आणि मातीची सुपीकता खालवत चालली आहे. त्याचे गंभीर परिणाम सामोरे येत आहेत. त्यावर मार्ग कसा काढता येईल व जमीन, पाणी, आरोग्य याचे संतुलन कसे साधता येईल. या संदर्भातील मार्गदर्शन सुविधा आष्टी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावे या उद्देशाने शेरी बु !! ता. आष्टी येथील वनराई व एल अँड टी. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी १६डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहीती खाकाळ व सोनवणे यांनी दिली या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने हरितक्रांती चे प्रणेते माजी राज्यमंत्री आ. सुरेश (आण्णा) धस आणि वनराई या सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे व शेती क्षेत्रात विविध प्रयोग करणारे वनराई चे अध्यक्ष श्री.रविंद्रजी धारिया हे पहिल्यांदाच आष्टी तालुक्यातील शेरी बु येथे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत. या मान्यवरांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांचा पुरवठा करून त्यांना सक्षम करण्यासाठी ‘वनराई एल. अँड टी. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस च्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकास प्रकल्पांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘वनराई व एल.अँड टी. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’ हे एक प्रगतशील व अत्याधुनिक शेती क्षेत्रातील काम करीत असून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन’ पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. म्हणून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच श्रीमती पुष्पा रविंद्र खाकाळ व पंचफुला दत्तात्रय सोनवणे यांनी केले आहे.