spot_img
spot_img

इंद्रायणीची सव्वासातशे वर्षानंतर देखील दिव्यत्वाची प्रचिती ! अवघ्या नवू वर्षाच्या मुलाचा नवू हजार ओव्याचा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखोद्गत ! आजोबा , आई ,वडीलांची पुण्याई फलद्रुप ! ज्ञानेश्वरीसाठी जिवन समर्पीत करण्याचा संकल्प !

शिरूर कासार (प्रतिनिधी): सव्वासातशे वर्ष होऊन गेले तरी आजही ईंद्रायणीच्या दिव्यत्वाची प्रचिती वारंवार दिसून येते अशीच नवलाईची गोष्ट सध्या एका अवघ्या नवू वर्षाच्या मुलाबाबत घडली आहे ,वयाच्या पांचव्या वर्षी अक्षर ओळख नसतांना वडीलाच्या तोंडून ज्ञानेश्वरीच्या ओव्या कर्णद्वारात प्रवेश करून त्या स्थिर होत होत वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी नवू हजार ओव्याचा ज्ञानेश्वरी ग्रंथ मुखोद्गत होणे ही देखील एक दिव्यत्वाची प्रचितीच म्हणावी लागेल .आजोबा व आई वडीलाची पुण्याई फलद्रुप झालेल्या ज्ञानेशअंश स्वरूप असलेल्या मुलाने आपण आपले सर्वस्व ज्ञानेश्वरीसाठीच समर्पीत करणार असल्याचा संकल्प केला आहे .

सोहंम पुंजाराम अमझरे या मुलाचा जन्म मार्च २०१४ मधे श्रीक्षेत्र आळंदी येथे परंपरेने वारकरी घराण्यात झाला ,आजोबा भजन करणारे असल्याने घरात सांप्रदायीक प्रसंन्नता तर पुढे वडील पुंजाराम अमझरे हे मृदंग वादक म्हणून परिचीत शिवाय मृदंग कला साधनेबरोबर तुळशिच्या माळा बनवणारे आळंदीत पहिले मानले जातात ,शिवाय सोहंमची आई सिमा अमझरे यांनी एका विश्वासाने गर्भसंस्कार म्हणून बाळ गर्भात असतांना ज्ञानेश्वरीचे एकशेआठ पारायण केले या सर्वांचा परिपाक आणि ज्ञानेश्वर माऊलीचा कृपाप्रसाद म्हणून सोहंम सारखे बाळ यांना प्राप्त झाले .

कोवळे वय ,निरागस आणि पारमार्थिक तेज त्यात ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कंठस्थ झाल्याने सोहंम चे वारकरी सांप्रदायाच्या पितृस्थानी असलेल्या व जोग महाराज यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत शांतीब्रम्ह मारूती बाबांच्या हस्ते सत्कार केला गेला तसेच श्रीक्षेत्र भगवान गडचे महंत डॉ न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी देखील अशिर्वाद दिले ,दिग्गज किर्तनकार चैतन्यमहाराज देगलूरकर ,रामभाऊ महाराज राऊत अशा अनेक महावैष्णवाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे .

फक्त ज्ञानेश्वरीचाच प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वस्व समर्पित करणार !

वय कोवळ असले तरी विचाराची प्रगल्भता सोहंम् ने लोकमतचे पत्रकार विजयकुमार गाडेकर यांचेशी बोलतांना दाखवून दिली ,आपण ज्ञानेश्वरीचाच प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण सर्वस्व समर्पित करणार असल्याचे सोहंमने सांगितले .

हा चमत्कार फक्त माऊलीचाच !

एरव्ही उच्च शिक्षीतांना सुध्दा ज्ञानेश्वरी वाचतांना जड जाते मात्र सोहमला नवव्या वर्षी ग्रंथ कंठसथ होणे हा चमत्कार फक्त माऊलीचाच असल्याचे सोहंम चे वडील पुंजाराम अमझरे यांनी सांगितले .

आपण फक्त निमित्तमात्र !

सोहंम सारखा मुलगा आम्हाला निव्वळ प्रसाद म्हणून मिळाला आहे ,मी फक्त त्याचेवर गर्मसंस्कार व्हावेत यासाठी मनोभावे एकशेआठ पारायण केले ,आणि त्याची फलश्रूती म्हणून शेवटच्या पारायण सांगतेला आमच्या पाळण्यात सोहंमसारखे बाळ माऊलीने दिले असल्याची शुध्द भावना सोहंमची आई सिमा अनझरे यांनी व्यक्त केली .त्याला माऊलीच सांभाळतील असा विश्वास देखील व्यक्त केला .

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!