spot_img
spot_img

विभागीय अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये गुरूकुलचे घवघवीत यश संग्राम पाचबैल याच्यासह चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परिक्षेसाठी निवड

आष्टा हरिनारायण (गहिनीनाथ पाचबैल) आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील गुरूकूल अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठवाडा विभागीय स्तरीय प्रोएक्टीव्ह अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून राज्यस्तरीय परिक्षेसाठी संग्राम पाचबैल याच्यासह चार विद्यार्थ्यांची निवड झाली असून गुरुकुलचे जाधव सर यांच्यासह विद्यार्थ्यांचे अभिनंदन ग्रामस्थांनसह मान्यवरांकडून होत आहे.
मंगळवार दिनांक १२/१२/२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रोएक्टीव्ह अबॅकस कॉम्पिटिशन वतीने २०२३-२०२४ विभागीय स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेमध्ये आठ जिल्ह्य़ातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन परिक्षा दिली होती. यामध्ये मातकुळी येथील गुरूकुलच्या एकुण चौतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये गुरूकूल क्लासेस मातकुळी येथील दहा विद्यार्थ्यांना प्रोएक्टीव्ह अबॅकसचे डायरेक्टर श्री गिरीश करडे,श्री अजय मणियार, सौ. सारीका करडे, सौ. तेजस्विनी सावंत, सौ. ज्योती मणियार, श्री संदिप वडेर यांच्यासह प्रोएक्टीव्ह अबॅकस टिमच्यावतीने एकनाथ रंगमंदिर छत्रपती संभाजीनगर येथे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच २५ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय परिक्षेसाठी एकुण पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आली यामध्ये दैनिक झुंजारनेताचे जेष्ठ पञकार गहिनीनाथ पाचबैल यांचा मुलगा संग्राम गहिनीनाथ पाचबैल इयत्ता पाचवी, कुमारी सायली सुनिल डोके, इयत्ता सहावी, ओमराज गजेंद्र आरेकर इयत्ता सातवी, प्रतिक्षा गोकुळ डोके इयत्ता आठवी, योगिता बाळासाहेब आरेकर इयत्ता आठवी यांचा समावेश झाल्याबद्दल श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सरकाळे सर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुर्यभान पठाडे सर, कडा कारखान्याचे माजी संचालक सुधाकर डोके, सरपंच बबन दादा डोके, उपसरपंच विशाल आबा जरे,उपप्राचार्य प्रा.पोपट जरे, सामाजिक कार्यकर्ते शेषराव आढाव, शिक्षणप्रेमी पालक प्रल्हाद जरे, नितीन धनवे, जेष्ठ शिक्षक विठ्ठल डोके सर, गणित अध्यापक मंडळाचे. ह. भ. प. अशोक डोके सर, जेष्ठ शिक्षक माने सर, नागरगोजे सर, महाव्दार सर, अशोक पठाडे सर, श्रीमती बाबर मॅडम, श्रीमती डमाळे मॅडम, गळगळटे सर, चेअरमन मोहन (तात्या) जरे, सचिन जरे, संभाजी खराडे, रमेश गिरी, अध्यक्ष अनिल डोके, आबासाहेब भवर, संतोष काका डोके, अशोक गोरे, विकास जरे, चेअरमन भरत डोके, कृषी तालुका समीती सदस्य रविदादा पाटील, सागर डोंगरे, महादेव डोके, प्रभू जरे, दत्ता माने, प्रमोद पाटील आदी ग्रामस्थांकडून अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच गुरूकुलच्या उर्वरित चोवीस विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!